sunilprem

Tuesday, January 09, 2007

झक्कास् विनोद् (लोकशाही)

दररोजचा शीस्तीचा भाग म्हणून पेपर वाचणार्या बंड्याने त्याच्या बाबांना वीचारलं,
"बाबा, लोकशाही म्हणजे काय हो?"
"त्याचं असं आहे"....
बाबा वीचार करत म्हणाले..."हे बघ, मी घरात पैसे कमावून आणतो. म्हणजे मी भांडवलदार;
तुझी आई हा पैसा कुठे-कसा खर्च करायचा हे ठरवते म्हणजे ती सरकार;
आपल्या घरातली मोलकरीण काम करते म्हणजे ती झाली कामगार;
तू सामन्य नागरीक आणी तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पीढी.
समजलं?
"बंडया वीचार करत झोपी गेला.
रात्री त्याचा लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला जाग आली.
अंथरूण ओलं केल्यामुळे तो रडत होता.
बंडया आईला उठवायला गेला.
ती गाढ झोपलेली असल्याने तो मोलकरणीला उठवायला गेला
तर तीच्या खोलीत बंडयाचे बाबा झोपलेले होते.
सकाळी बाबांनी बंडयाला वीचारलं..."काय बंडोपंत?...कळली का लोकशाही?
" बंडया म्हणाला..." कळलं बाबा.
जेव्हा भांडवलदार कामगारांचं शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ झोपेत असतं.
देशाची भावी पीढी मूलभूत सोयींसाठी रडत असते
आणी या सर्वांचा त्रास फक्त सामन्य नागरीकाला सहन करावा लागतो".

1 Comments:

  • At 1:17 AM, Blogger Vaishali Hinge said…

    सुनिल पवार तुमही माझई परवानगिइ न घेता मी केलेले विड.न्बन वर टाकलेले आहे.. मी हे विडंबन मायबोली या site वर लिहिलेले आहे. तीथुन आपण हे चोरलेले असल्याने ताबडतोब इथुन उडवावे. पुन्हा अशी चोरी करु नये.ही विनंती

     

Post a Comment

<< Home