sunilprem

Saturday, January 13, 2007

ज्योत

आम्ही नाही वाऱ्यावर सोडलेले,
कितीही भिरभिरले पंख नभात तरी जमीनीशी जोड्लेले..
आकाशाला गवसणी घालताना,
गरज असते मातीच्या आश्वस्थ नजरेची..
उडायची हॊस संपल्यावर,
दाणा टिपायला जमीनीवर यायची..
मांजा घट्ट धरुन ठेवला,
तर पतंग कधी उडेल का?
वाट शोधायची असेल त्याला त्याची
तर दोऱ्याला ढिल हवी ना?
घरट्यात फ़क्त बसुन, उडणं शिकता येत नाही,
वाऱ्याशी झुंज मग पेलवत नाही..
कधी थकतील पंख अन अडखळुन जखमाही होतील,
पण याच जखमा हातातील बळ बनुन जगाचा सामना करतील
मातीचा सुगंध फ़िकट होतोय अगदी मान्य..
पण कोसळणारा पाऊसही नाही ना सामान्य?
सुर्याचे धगधगतं तेज
पॊणिमेच्या चंद्राची जागा कधीच नाही घेणार,
कितीही वणवा पेटला चहुबाजुंना
तरी मनात एक नितळ ज्योत तेवतच राहणार..

0 Comments:

Post a Comment

<< Home