sunilprem

Saturday, January 13, 2007

मी डोसा खाल्ला नाही मी..

मी डोसा खाल्ला नाही, मी ईडली खाल्ली नाही..
मी साखर सुध्दा साधी कधी चहात घेतली नाही..!!!
भोवताली पार्टी चाले, ती विस्फ़ारुन बघतांना कुणी गुलाबजाम ओरपतांना,
कुणी रसगुल्ले ढापताना.. मी सॅलड खात बसलो..
सगळ्यांच्या सोबत जेव्हा... वरण भातही साधा मज कुणी विचारला नाही...
मी डोसा.. खाल्ला नाही..मी.............
वडा बघत राहीलो.., पावही कधी ना चाखले..
अन पोट भरुन कधीही मी छोले खाल्ले नाहीत
कुणी अग्रह केला तरी,प्लेट भरुन घेतली नाही..
एकच कोवळी काकडी, अन उकडलेली अंडी..
नाकात अजुन दरवळे ती भरलेली भेंडी..
मी वजन काट्याला भ्यालो..,
मी वाढत्या घेरालाही भ्यालो..
मी मनात सुध्दा माझ्या कधी भजी तळली नाही..
मी डोसा खाल्ला नाही मी....... .....
मज नाश्ता जर का मिळता मी गाजर खाल्ले असते
कुणा बोलवले घरी तर रताळे उकडले असते..
म्हणुन मजकडे कोणी आले वा गेले नाही..
मी अस्सा स्लिम आहे... की एक कपडाही कधी......
उसवावा लागला नाही....!!!!

4 Comments:

  • At 1:12 AM, Blogger Vaishali Hinge said…

    हेल्लो mr सुनिल पवार माझे आडनाव बंधु आहात आणिइ आशिइ चोरिइ करता का.. हए विड.न्बन माझे आहे मिइ केलेले आहे आणिइ माय्बोलि या site टकलेले आहे.. बघुन या जरआ दुसयाच्या प्रतीभेला स्वताचई समजता???/ तुमचिइ नाहिइ तर विचाराय्चे कष्ट घ्याय्चे ना

     
  • At 12:20 PM, Blogger Meenakshi Hardikar said…

    काय भाऊ लोकांच्या कविता ढापुन स्वताच्या नावावर खपवता. मायबोलीवर लोपानी टाकलेलं विडंबन आहे हे.

     
  • At 12:25 PM, Blogger Kamini Phadnis Kembhavi said…

    tumhi hee kavitaa maajhi naahi asM jaaheer karaav krupayaa........

    hee kavitaa lopaamudraachich aahe

     
  • At 1:18 AM, Blogger कोणीतरी said…

    बिनडोकपणाची कमाल अशी की "धाडसाने" चोरी करायचीच तर ती एखाद्या चांगल्या कवितेची तरी करायची.

     

Post a Comment

<< Home