sunilprem

Monday, February 05, 2007

झक्कास् विनोद्

सरकारी वकील आणि डिफेन्स चा वकील फेरतपासणी करून करून कंटाळलेला
सरकारी वकील आरोपीला म्हणाला :
आता मी जे विचारीन त्याचं केवळ हो किंवा नाही, एवढच उत्तर दे.
खाल्ल्या मिठाला जागणारा बचाव पक्षाचा वकील: ऑब्जेक्षन माय लॉर्ड!
सरकारी वकील माझ्या अशीलाला फसवू पाहत आहेत.
काही प्रश्नांची उत्तरे केवळ हो किंवा नाही, अशी देता येत नाहीत.
सरकारी वकील: का नाही?
डिफेन्स चा वकील: असं असेल तर माझ्या २ प्रश्नांची उत्तरे द्या.
सरकारी वकील: विचारा.
डिफेन्स चा वकील: १) तुम्ही अजुनही तुमच्या बायकोचा मार खाता?
२) आजदेखील तुमच्या घरी तुम्हीच जेवण बनवता?
...................................................................................................................................................................
साक्षीदार आणि लग्न
वकील : काय रे तुझे लग्न कुणाशी झाले आहे?
साक्षीदार : हुजूर, माझे एका स्त्रीशी लग्न झाले आहे.
वकील : वा! काय पण उत्तर आहे. अरे, सगळयांचे लग्न स्त्रीशीच होते.
साक्षीदार : का बरे, गेल्या वर्षी माझ्या बहिणीने लग्न केले ते तर एका पुरुषा बरोबर.
...................................................................................................................................................................
दोन मुंग्या झाडावर चालत असतात , तेव्हढ्यात खालुन एक हत्ती जातो,
फांदी हलल्याने एक मुंगी खाली पडते, तेव्हा वरची मुंगी म्हणते "दबा दे सालेको"
मग पडणारी मुंगी म्हणते "जाने दो, अकेला है "

0 Comments:

Post a Comment

<< Home