sunilprem

Thursday, April 01, 2010

मराठ्याची व्याख्या काय?

मराठ्याची व्याख्या काय?

मी मराठी पण मराठ्याची व्याख्या काय? ठेच लागल्यानंतर ज्याच्या तोंडातुन; आई,ग: आसे उदगार निघतात तो माणुस मराठी. लहान मुलांचे नाव ठेवताना ज्या घरातिल माय,बहिणी शिवाजीचा पाळणा म्हणतात ते घर मराठी माणसाचें.. शिव चरीत्र वाचताना ज्याचा उर अभीमानान भरुन येतो ति छाती मराठी माणसाची... धर्मविर संभाजी महाराजांचे तुरुंगातले केलेल्या छळ, व हालांची कहाणी वाचताना ज्यांच मन शोक संतप्त होउन उठत ते मन मराठी मन... मराठा मोडेल पण वाकणार नाहीमराठा मोडेल पण वाकणार नाहीपेटतील मशाली वीझतील मशालीसुर्या कधीच विझनार नाहीप्रयत्न करा किती ही पणहे कधीच घडणार नाहीमराठा मोडेल पण वाकणार नाहीमराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाहीमराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाहीआणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही

Labels:

मराठ्याची व्याख्या काय?

मराठ्याची व्याख्या काय?

मी मराठी पण मराठ्याची व्याख्या काय? ठेच लागल्यानंतर ज्याच्या तोंडातुन; आई,ग: आसे उदगार निघतात तो माणुस मराठी. लहान मुलांचे नाव ठेवताना ज्या घरातिल माय,बहिणी शिवाजीचा पाळणा म्हणतात ते घर मराठी माणसाचें.. शिव चरीत्र वाचताना ज्याचा उर अभीमानान भरुन येतो ति छाती मराठी माणसाची... धर्मविर संभाजी महाराजांचे तुरुंगातले केलेल्या छळ, व हालांची कहाणी वाचताना ज्यांच मन शोक संतप्त होउन उठत ते मन मराठी मन... मराठा मोडेल पण वाकणार नाहीमराठा मोडेल पण वाकणार नाहीपेटतील मशाली वीझतील मशालीसुर्या कधीच विझनार नाहीप्रयत्न करा किती ही पणहे कधीच घडणार नाहीमराठा मोडेल पण वाकणार नाहीमराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाहीमराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाहीआणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही

Labels:

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ
नकामृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे,
असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल
तरीएकट्यानेच ते फुलवत ...

Labels:

Wednesday, August 01, 2007

चारोळ्या

आपला ग्लास आपण सांभाळावा
दुसर्‍याला घेऊ देऊ नये
दुसर्‍याचा ग्लास उचलण्याची
वेळ आपल्यावर येऊ नये

अशीही वेळ असते जेंव्हा
कोणीच आपला नसतो
म्हणून आपण प्यायला जातो
तर नेमका ड्राय डे असतो

आपला पेग आपण भरावा
दुसर्‍यावर विश्वास ठेवू नये
आपला ग्लास, आपली बाटली
दुसर्‍याच्या हातात देऊ नये

असं उगीच लोकांना वाटतं
की दुःख दारूत बुडून जातं
दुःख असतं हलकं हलकं
अल्कोहोलसोबत उडून जातं!

एकदा प्यायला बसल्यानंतर
तुझं-माझं करू नये
तुझी काय, माझी काय
नशा कधी सरू नये

तुला जायचंच असेल तर निघून जा,
जाण्यासाठी भांडू नकोस
प्यायची नसेल तर पिऊ नको,
पण दारू अशी सांडू नकोस

स्कॉच प्यावी कोरी, कच्चीबर्फ नको ,
सोडा नकोउंच आभाळी उडण्यासाठी पंख हवे... घोडा नको!
आपला आवाज दणकयात हवा
उगाच लाऊडस्पीकर कशाला ?

पिऊन प्यायची तर देशी प्यायची
उगाच फॉरीन लिकर कशाला ?
फॉरीन लिकर कितीही प्यावी
काही केल्या चढत नाही
देशी आपली थोडीशीच प्यावी
दोन दोन दिवस उतरत नाही

Wednesday, February 14, 2007

व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन?

(तो हातात गुलाब घेवून, चेहर्यावर क्रिमचा लेप लावून व्हेलेंटाईन डे च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो)
पुढे...

तो- व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन?
ती- तू इथून जा नाहीतर मीच निघून जाईन.
तो- आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आणि तू मला झिडकारतेस,
खरं सांग मला, तू ही माझ्यावर प्रेम करतेस?
ती- प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवसाची गरज असते?
माझे तूझ्यावर प्रेम असते तर, तूला जायाला सांगीतले नसते
तो- मला माहित आहे तू खोटे बोलतेस,
ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस
ती- माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत दिसते,
तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण येते
तो- मग रोज घरी जाताना मागे का वळ्तेस?
सारखं मागे वळुन मला का पहातेस?
ती- मला मोकाट सोडलेल्या कुत्र्यांची खूप भिती वाटते म्हणूनच
मी सारखं मागे वळुन पहाते
तो- माझ्या प्रेमाचा असा अपमान मी सहण करणार नाही,
आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार नाही
ती- तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून आनंद झाला,
पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा, आज वेळ कसा वाया गेला?
तो- (खिशातील मुलींची नावे व पत्ते असलेली लिस्ट काढून)
ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहे
या प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहे
आज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणार
एक -दोघींचा तरी होकार मला नक्की मिळणार
ह्या दिवसाचा एक एक क्शण माझ्यासाठी अनमोल आहे
तूझं माझ्यावर प्रेम आहे का? या सर्वांना विचारायचं आहे
ती- तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल,
जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल

(दोघे ही आप-आपल्या मार्गाने जावू लागतात.
इतक्यात तिला आवाज येतो व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन?
आवाज देणारा तोच असतो. खुप राग आला असताना ही ती
नकळत तो जवळ येण्याची वाट पाहत थांबते.
जवळ येताच तो तिच्या हातावर नावांची यादि असलेला कागद ठेवतो.
कागद पहाते आणि अचंबित होते.) पुढे ...
ती- ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त माझेच नाव आहे.
सांगशिल का याचा अर्थ काय आहे?
तो- प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत आहेस
फ़क्त तुझाच आहे , तुला एवढचं सांगायचं आहे.
चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू लागतो.. थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो..
व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन? तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने वळुन पाहतो.
ती पुन्हा मोठ्याने ओरडत त्याला विचारते ... व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन)

Monday, February 05, 2007

झक्कास् विनोद्

सरकारी वकील आणि डिफेन्स चा वकील फेरतपासणी करून करून कंटाळलेला
सरकारी वकील आरोपीला म्हणाला :
आता मी जे विचारीन त्याचं केवळ हो किंवा नाही, एवढच उत्तर दे.
खाल्ल्या मिठाला जागणारा बचाव पक्षाचा वकील: ऑब्जेक्षन माय लॉर्ड!
सरकारी वकील माझ्या अशीलाला फसवू पाहत आहेत.
काही प्रश्नांची उत्तरे केवळ हो किंवा नाही, अशी देता येत नाहीत.
सरकारी वकील: का नाही?
डिफेन्स चा वकील: असं असेल तर माझ्या २ प्रश्नांची उत्तरे द्या.
सरकारी वकील: विचारा.
डिफेन्स चा वकील: १) तुम्ही अजुनही तुमच्या बायकोचा मार खाता?
२) आजदेखील तुमच्या घरी तुम्हीच जेवण बनवता?
...................................................................................................................................................................
साक्षीदार आणि लग्न
वकील : काय रे तुझे लग्न कुणाशी झाले आहे?
साक्षीदार : हुजूर, माझे एका स्त्रीशी लग्न झाले आहे.
वकील : वा! काय पण उत्तर आहे. अरे, सगळयांचे लग्न स्त्रीशीच होते.
साक्षीदार : का बरे, गेल्या वर्षी माझ्या बहिणीने लग्न केले ते तर एका पुरुषा बरोबर.
...................................................................................................................................................................
दोन मुंग्या झाडावर चालत असतात , तेव्हढ्यात खालुन एक हत्ती जातो,
फांदी हलल्याने एक मुंगी खाली पडते, तेव्हा वरची मुंगी म्हणते "दबा दे सालेको"
मग पडणारी मुंगी म्हणते "जाने दो, अकेला है "

Monday, January 29, 2007

लग्न पत्रिका

Thursday, January 18, 2007

झक्कास् विनोद् (बायको)

पक्या पेताड सकाळी दहाला आळसटलेल्या स्थितीत, तांबारलेल्या डोळ्यांनी बिछान्यात उठून बसला आणि शेजारच्या टेबलावर अॅस्पिरिनची गोळी आणि पाण्याचा ग्लास बघून थक्कच झाला. मग त्याचं लक्ष अंगातल्या कपड्यांकडे गेलं, ते अगदी स्वच्छ होते. त्याची खोलीही स्वच्छ झाडलेली होती. आश्चर्यचकित होऊन तो किचनमध्ये आला, तर डायनिंग टेबलवर गरमागरम नाश्ता, चहा आणि पेपर त्याची वाट पाहात होता. तिथेच बायकोची चिठी होती. 'मी बाजारात जाऊन येतेय. तुम्ही नाश्ता करून, आंघोळ उरकून घ्या. आज मस्त फिश करीचा बेत आहे दुपारी.' आता तर हद्दच झाली. पक्यानं आपल्या मुलाला विचारलं, ''काल रात्री काय झालं रे?'' '' काय होणार? नेहमीचंच,'' मुलगा म्हणाला, ''तुम्ही फुल टाइट झिंगून, गटारात पडून, घाण कपड्यांनी घरी आलात. घरातच तीन वेळा पडलात. एक खुचीर् मोडलीत.'' '' बाप रे! मग तुझ्या आईनं आज घर डोक्यावरच घ्यायला हवं होतं. पण, हे स्वच्छ कपडे, नाश्ता, पेपर, ही चिठ्ठी...'' मुलगा म्हणाला, ''रात्री तुम्हाला बिछान्यावर झोपवून आई तुमचे घाणेरडे कपडे काढू लागली तेव्हा तुम्ही नशेत बरळलात, 'ओ ताई, काय करताय? घरी बायको आहे माझी लग्नाची!!!!''

Saturday, January 13, 2007

"आठवणी"

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवे भोवती गंध घेवून रानोमाळ पसरलेले. . .
आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग तो चंद्र रात्र जागलेला. . .
जाणवायची नकळत मग
ती बोचरी थंडी गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. . .
आठवून यायची, तीची सारी वचने अशीच
कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .
दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"

आयुष्याच्या अल्बममध्ये

आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.
आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.
भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचण सुध्धा जमल पाहिजे.
गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.
कधीतरी एकटे उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे.
सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.
द्यायला कोनी नसल म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळ भरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.
रात्री झोपताना मात्र दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा!

दोस्त

खुशी भी दोस्तो से है,
गम भी दोस्तो से है,
तकरार भी दोस्तो से है,
प्यार भी दोस्तो से है,
रुठना भी दोस्तो से है,
मनाना भी दोस्तो से है,
बात भी दोस्तो से है,
मिसाल भी दोस्तो से है,
नशा भी दोस्तो से है,
शाम भी दोस्तो से है,
जिन्दगी की शुरुआत भी दोस्तो से है,
जिन्दगी मे मुलाकात भी दोस्तो से है,
मौहब्बत भी दोस्तो से है,
इनायत भी दोस्तो से है,
काम भी दोस्तो से है,
नाम भी दोस्तो से है,
ख्याल भी दोस्तो से है,
अरमान भी दोस्तो से है,
ख्वाब भी दोस्तो से है,
माहौल भी दोस्तो से है,
यादे भी दोस्तो से है,
मुलाकाते भी दोस्तो से है,
सपने भी दोस्तो से है,
अपने भी दोस्तो से है,
या यूं कहो यारो,
अपनी तो दुनिया ही दोस्तो से है

कोणी गेलं म्हणुन.......

कोणी गेलं म्हणुन
आपण आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,
जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.
आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,
आभाळापर्यत पोहचता येत नसतं
कधी त्याला खाली खेचायचं असतं.
कसं ही असलं आयुष्यं
आपलं मनापासुन जगायचं असतं,
कोणी गेलं म्हणुन
उगाच आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.
दिवस तुझा नसेलही,
रात्र तुझीच असेलत्या रात्रीला
नवं स्वप्न मागायचं असतं,
तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं.

मी डोसा खाल्ला नाही मी..

मी डोसा खाल्ला नाही, मी ईडली खाल्ली नाही..
मी साखर सुध्दा साधी कधी चहात घेतली नाही..!!!
भोवताली पार्टी चाले, ती विस्फ़ारुन बघतांना कुणी गुलाबजाम ओरपतांना,
कुणी रसगुल्ले ढापताना.. मी सॅलड खात बसलो..
सगळ्यांच्या सोबत जेव्हा... वरण भातही साधा मज कुणी विचारला नाही...
मी डोसा.. खाल्ला नाही..मी.............
वडा बघत राहीलो.., पावही कधी ना चाखले..
अन पोट भरुन कधीही मी छोले खाल्ले नाहीत
कुणी अग्रह केला तरी,प्लेट भरुन घेतली नाही..
एकच कोवळी काकडी, अन उकडलेली अंडी..
नाकात अजुन दरवळे ती भरलेली भेंडी..
मी वजन काट्याला भ्यालो..,
मी वाढत्या घेरालाही भ्यालो..
मी मनात सुध्दा माझ्या कधी भजी तळली नाही..
मी डोसा खाल्ला नाही मी....... .....
मज नाश्ता जर का मिळता मी गाजर खाल्ले असते
कुणा बोलवले घरी तर रताळे उकडले असते..
म्हणुन मजकडे कोणी आले वा गेले नाही..
मी अस्सा स्लिम आहे... की एक कपडाही कधी......
उसवावा लागला नाही....!!!!

जीवनपुष्प. . .

फुले शितात......,
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी
डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे
स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे
कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा
कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी
कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा
कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी
कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला ठेच देवून जागे करावे

झक्कास् विनोद् (चमचमीत चायनीज)

पंजाबच्या प्राणिसंग्रहालयातील एक वाघ पिंजऱ्यातू निसटला आणि थेट माणसांमध्ये घुसला.
हजारो माणसांची पळापळ झाली.
वाघाने काहीशे माणसांचा पाठलाग केला,
पण अखेरीस त्याने दोन चिनी पर्यटकांना पकडून त्यांचा फडशा पाडला.
वाघोबा पिंजऱ्यात परतल्यानंतर वाघीणबाईंनी विचारले,
'अहो, इतकी माणसं होती तुमच्यासमोर, इतकी धावपळ करून या दोन चिन्यांनाच का मारलंत तुम्ही?'
वाघोबा म्हणाले, 'काय करणार? कितीतरी दिवस इच्छा अपुरी होती माझी चमचमीत चायनीज खाण्याची!!!'

ज्योत

आम्ही नाही वाऱ्यावर सोडलेले,
कितीही भिरभिरले पंख नभात तरी जमीनीशी जोड्लेले..
आकाशाला गवसणी घालताना,
गरज असते मातीच्या आश्वस्थ नजरेची..
उडायची हॊस संपल्यावर,
दाणा टिपायला जमीनीवर यायची..
मांजा घट्ट धरुन ठेवला,
तर पतंग कधी उडेल का?
वाट शोधायची असेल त्याला त्याची
तर दोऱ्याला ढिल हवी ना?
घरट्यात फ़क्त बसुन, उडणं शिकता येत नाही,
वाऱ्याशी झुंज मग पेलवत नाही..
कधी थकतील पंख अन अडखळुन जखमाही होतील,
पण याच जखमा हातातील बळ बनुन जगाचा सामना करतील
मातीचा सुगंध फ़िकट होतोय अगदी मान्य..
पण कोसळणारा पाऊसही नाही ना सामान्य?
सुर्याचे धगधगतं तेज
पॊणिमेच्या चंद्राची जागा कधीच नाही घेणार,
कितीही वणवा पेटला चहुबाजुंना
तरी मनात एक नितळ ज्योत तेवतच राहणार..

प्रेमाला उपमा नाहि...

प्रेमाला उपमा नाहि,
उपम्यात साखर नाहि,
साखरेला ऊस नाहि,
ऊसाला पाणी नाहि,
पाण्याला पम्प नाहि,
पम्पाला वीज़ नाहि,
विज़ेला पैसा नाहि,
पैश्याला काम नाहि,
कामाला नोकरी नाहि,
नोकरी ला डेग्री नाहि,
डेग्री ला कालेज नाहि,
कालेज ला पोरी नाहित.....
पोरीना प्रेम नाहि!!!!!!
प्रेमाला उपमा नाहि...