sunilprem

Monday, January 29, 2007

लग्न पत्रिका

Thursday, January 18, 2007

झक्कास् विनोद् (बायको)

पक्या पेताड सकाळी दहाला आळसटलेल्या स्थितीत, तांबारलेल्या डोळ्यांनी बिछान्यात उठून बसला आणि शेजारच्या टेबलावर अॅस्पिरिनची गोळी आणि पाण्याचा ग्लास बघून थक्कच झाला. मग त्याचं लक्ष अंगातल्या कपड्यांकडे गेलं, ते अगदी स्वच्छ होते. त्याची खोलीही स्वच्छ झाडलेली होती. आश्चर्यचकित होऊन तो किचनमध्ये आला, तर डायनिंग टेबलवर गरमागरम नाश्ता, चहा आणि पेपर त्याची वाट पाहात होता. तिथेच बायकोची चिठी होती. 'मी बाजारात जाऊन येतेय. तुम्ही नाश्ता करून, आंघोळ उरकून घ्या. आज मस्त फिश करीचा बेत आहे दुपारी.' आता तर हद्दच झाली. पक्यानं आपल्या मुलाला विचारलं, ''काल रात्री काय झालं रे?'' '' काय होणार? नेहमीचंच,'' मुलगा म्हणाला, ''तुम्ही फुल टाइट झिंगून, गटारात पडून, घाण कपड्यांनी घरी आलात. घरातच तीन वेळा पडलात. एक खुचीर् मोडलीत.'' '' बाप रे! मग तुझ्या आईनं आज घर डोक्यावरच घ्यायला हवं होतं. पण, हे स्वच्छ कपडे, नाश्ता, पेपर, ही चिठ्ठी...'' मुलगा म्हणाला, ''रात्री तुम्हाला बिछान्यावर झोपवून आई तुमचे घाणेरडे कपडे काढू लागली तेव्हा तुम्ही नशेत बरळलात, 'ओ ताई, काय करताय? घरी बायको आहे माझी लग्नाची!!!!''

Saturday, January 13, 2007

"आठवणी"

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवे भोवती गंध घेवून रानोमाळ पसरलेले. . .
आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग तो चंद्र रात्र जागलेला. . .
जाणवायची नकळत मग
ती बोचरी थंडी गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. . .
आठवून यायची, तीची सारी वचने अशीच
कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .
दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"

आयुष्याच्या अल्बममध्ये

आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.
आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.
भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचण सुध्धा जमल पाहिजे.
गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.
कधीतरी एकटे उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे.
सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.
द्यायला कोनी नसल म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळ भरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.
रात्री झोपताना मात्र दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा!

दोस्त

खुशी भी दोस्तो से है,
गम भी दोस्तो से है,
तकरार भी दोस्तो से है,
प्यार भी दोस्तो से है,
रुठना भी दोस्तो से है,
मनाना भी दोस्तो से है,
बात भी दोस्तो से है,
मिसाल भी दोस्तो से है,
नशा भी दोस्तो से है,
शाम भी दोस्तो से है,
जिन्दगी की शुरुआत भी दोस्तो से है,
जिन्दगी मे मुलाकात भी दोस्तो से है,
मौहब्बत भी दोस्तो से है,
इनायत भी दोस्तो से है,
काम भी दोस्तो से है,
नाम भी दोस्तो से है,
ख्याल भी दोस्तो से है,
अरमान भी दोस्तो से है,
ख्वाब भी दोस्तो से है,
माहौल भी दोस्तो से है,
यादे भी दोस्तो से है,
मुलाकाते भी दोस्तो से है,
सपने भी दोस्तो से है,
अपने भी दोस्तो से है,
या यूं कहो यारो,
अपनी तो दुनिया ही दोस्तो से है

कोणी गेलं म्हणुन.......

कोणी गेलं म्हणुन
आपण आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,
जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.
आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,
आभाळापर्यत पोहचता येत नसतं
कधी त्याला खाली खेचायचं असतं.
कसं ही असलं आयुष्यं
आपलं मनापासुन जगायचं असतं,
कोणी गेलं म्हणुन
उगाच आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.
दिवस तुझा नसेलही,
रात्र तुझीच असेलत्या रात्रीला
नवं स्वप्न मागायचं असतं,
तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं.

मी डोसा खाल्ला नाही मी..

मी डोसा खाल्ला नाही, मी ईडली खाल्ली नाही..
मी साखर सुध्दा साधी कधी चहात घेतली नाही..!!!
भोवताली पार्टी चाले, ती विस्फ़ारुन बघतांना कुणी गुलाबजाम ओरपतांना,
कुणी रसगुल्ले ढापताना.. मी सॅलड खात बसलो..
सगळ्यांच्या सोबत जेव्हा... वरण भातही साधा मज कुणी विचारला नाही...
मी डोसा.. खाल्ला नाही..मी.............
वडा बघत राहीलो.., पावही कधी ना चाखले..
अन पोट भरुन कधीही मी छोले खाल्ले नाहीत
कुणी अग्रह केला तरी,प्लेट भरुन घेतली नाही..
एकच कोवळी काकडी, अन उकडलेली अंडी..
नाकात अजुन दरवळे ती भरलेली भेंडी..
मी वजन काट्याला भ्यालो..,
मी वाढत्या घेरालाही भ्यालो..
मी मनात सुध्दा माझ्या कधी भजी तळली नाही..
मी डोसा खाल्ला नाही मी....... .....
मज नाश्ता जर का मिळता मी गाजर खाल्ले असते
कुणा बोलवले घरी तर रताळे उकडले असते..
म्हणुन मजकडे कोणी आले वा गेले नाही..
मी अस्सा स्लिम आहे... की एक कपडाही कधी......
उसवावा लागला नाही....!!!!

जीवनपुष्प. . .

फुले शितात......,
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी
डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे
स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे
कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा
कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी
कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा
कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी
कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला ठेच देवून जागे करावे

झक्कास् विनोद् (चमचमीत चायनीज)

पंजाबच्या प्राणिसंग्रहालयातील एक वाघ पिंजऱ्यातू निसटला आणि थेट माणसांमध्ये घुसला.
हजारो माणसांची पळापळ झाली.
वाघाने काहीशे माणसांचा पाठलाग केला,
पण अखेरीस त्याने दोन चिनी पर्यटकांना पकडून त्यांचा फडशा पाडला.
वाघोबा पिंजऱ्यात परतल्यानंतर वाघीणबाईंनी विचारले,
'अहो, इतकी माणसं होती तुमच्यासमोर, इतकी धावपळ करून या दोन चिन्यांनाच का मारलंत तुम्ही?'
वाघोबा म्हणाले, 'काय करणार? कितीतरी दिवस इच्छा अपुरी होती माझी चमचमीत चायनीज खाण्याची!!!'

ज्योत

आम्ही नाही वाऱ्यावर सोडलेले,
कितीही भिरभिरले पंख नभात तरी जमीनीशी जोड्लेले..
आकाशाला गवसणी घालताना,
गरज असते मातीच्या आश्वस्थ नजरेची..
उडायची हॊस संपल्यावर,
दाणा टिपायला जमीनीवर यायची..
मांजा घट्ट धरुन ठेवला,
तर पतंग कधी उडेल का?
वाट शोधायची असेल त्याला त्याची
तर दोऱ्याला ढिल हवी ना?
घरट्यात फ़क्त बसुन, उडणं शिकता येत नाही,
वाऱ्याशी झुंज मग पेलवत नाही..
कधी थकतील पंख अन अडखळुन जखमाही होतील,
पण याच जखमा हातातील बळ बनुन जगाचा सामना करतील
मातीचा सुगंध फ़िकट होतोय अगदी मान्य..
पण कोसळणारा पाऊसही नाही ना सामान्य?
सुर्याचे धगधगतं तेज
पॊणिमेच्या चंद्राची जागा कधीच नाही घेणार,
कितीही वणवा पेटला चहुबाजुंना
तरी मनात एक नितळ ज्योत तेवतच राहणार..

प्रेमाला उपमा नाहि...

प्रेमाला उपमा नाहि,
उपम्यात साखर नाहि,
साखरेला ऊस नाहि,
ऊसाला पाणी नाहि,
पाण्याला पम्प नाहि,
पम्पाला वीज़ नाहि,
विज़ेला पैसा नाहि,
पैश्याला काम नाहि,
कामाला नोकरी नाहि,
नोकरी ला डेग्री नाहि,
डेग्री ला कालेज नाहि,
कालेज ला पोरी नाहित.....
पोरीना प्रेम नाहि!!!!!!
प्रेमाला उपमा नाहि...

Friday, January 12, 2007

प्रेमात सगळ असच असत..

किती रे छळतोस मला?
नदि सागराला म्हणाली
अन् कोसळनाऱ्या प्रत्येक् लाटेत
माझे अस्तित्व भिजवतोस्...

भिजवणारा ओलावा माझ्यात् कधिच् नव्हता..
नदिला कवेत् घेत् सागर् हळुच म्हणाला,
विचार् त्या सुर्याला
दररोज माझ्यात बुडुन् सुध्दा..
तो मात्र् कोरडाच उरलाय

तुझ माझ्यावर् प्रेमच नाहि
आज् चन्द्र सुध्दा आकाशावर रागवला
अन् विझत जानाऱया डोळ्याने
उगवत्या सुर्याकडे पाहत् राहिला


प्रेम तुझ्यावर नाहितर कुणावर करणार
आरक्त नजरेने आकाश बोलल...
अन् ताऱ्याना अन्धारात् पेटवुन कोणाचि वाट बघणार?
प्रेमात सगळ असच असत..
तो मनाशिच् म्हणाला
अन् पुन्हा तिचि वाट् बघत्
वाळुत् घरे बान्धत राहिला!!!

Tuesday, January 09, 2007

बाकी काही नाही

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल
बहुधा श्वास घाबरुन बिबरुन जाण्यासारखं
बिलकुल काही नाही कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडेसांगुन द्यावं
काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय",
बाकी काही नाही

प्रेमाचा अर्थ

दूरवरच्या माळावर मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं टुझ्याही मनात तेच चाललयं का
जे माझ्या मनात तर म्हनाला
मी तर पडलोय प्रेमात तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं प्रेम म्हनजे काय असतं
तर म्हनाला प्रेम हे जगन्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाख वणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस
तर म्हणाला मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो अरे मी तीला ओळखतो,
सगळेच ओळ्खतात ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं
अरे मग तर तू मुर्खच अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोय
सतर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते
मी खिन्न मनाने परत निघालो थोडा दूर गेलो असेल
तोच काडकन आवाज झाला प्रकाशाचा लोळ उठला
मेघातून निघालेली वीज धाडकन वडावर कोसळली
मी त्याच्याकडे पाहिले मरणाच्या दारात असुनही तो हसत होता
मला म्हनाला अरे मी तिच्यासोबत घालवलेला हा क्षण मला पुरेसा आहे
मी समाधानाने प्राण सोडतो आहे
मी मात्र सुन्न झालो होतो
प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता.

झक्कास् विनोद् ('राष्ट्रपिता' )

एकदा देवाने माधवराव शिंद्यांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?"
माधवराव शिंदे म्हणाले, "एक".
देवाने खूश होऊन त्यांना एक नवीकोरी मर्सिडीझ भेट म्हणून दिली.
नंतर देवाने विलासराव देशमुखांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?"
विलासराव म्हणाले, "तीन".
देव थोडासा नाराज झाला आणि त्याने त्यांना एक होंडा सिटी भेट म्हणून दिली.
त्यानंतर देवाने लालूप्रसाद यादवांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?"
लालू म्हणाले, "बारा".
देव चिडला. त्याने लालूंना एक जुनीपुराणी स्कूटर दिली.
हे तिघे रस्त्यातून जात असताना काही वेळाने त्यांना गांधीजी चालत येताना दिसले.
लालूंनी गांधीजींना विचारलं, "काय हो गांधीजी, देवाने तुम्हाला काही दिलं नाही वाटतं?"
गांधीजी म्हणाले, "ते राहू द्या.
आधी मला सांगा की देवाला कोणी सांगितलं की मला 'राष्ट्रपिता' म्हणतात?"

झक्कास् विनोद् (लोकशाही)

दररोजचा शीस्तीचा भाग म्हणून पेपर वाचणार्या बंड्याने त्याच्या बाबांना वीचारलं,
"बाबा, लोकशाही म्हणजे काय हो?"
"त्याचं असं आहे"....
बाबा वीचार करत म्हणाले..."हे बघ, मी घरात पैसे कमावून आणतो. म्हणजे मी भांडवलदार;
तुझी आई हा पैसा कुठे-कसा खर्च करायचा हे ठरवते म्हणजे ती सरकार;
आपल्या घरातली मोलकरीण काम करते म्हणजे ती झाली कामगार;
तू सामन्य नागरीक आणी तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पीढी.
समजलं?
"बंडया वीचार करत झोपी गेला.
रात्री त्याचा लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला जाग आली.
अंथरूण ओलं केल्यामुळे तो रडत होता.
बंडया आईला उठवायला गेला.
ती गाढ झोपलेली असल्याने तो मोलकरणीला उठवायला गेला
तर तीच्या खोलीत बंडयाचे बाबा झोपलेले होते.
सकाळी बाबांनी बंडयाला वीचारलं..."काय बंडोपंत?...कळली का लोकशाही?
" बंडया म्हणाला..." कळलं बाबा.
जेव्हा भांडवलदार कामगारांचं शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ झोपेत असतं.
देशाची भावी पीढी मूलभूत सोयींसाठी रडत असते
आणी या सर्वांचा त्रास फक्त सामन्य नागरीकाला सहन करावा लागतो".